New Navhind Multi Purpose Multi State Co-op Society, Belgaum

About New Navhind Society
ABOUT NAVHIND MULTIPURPOSE SOCIETY
नवहिंद क्रीडा केंद्र
नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर या संघटनेची स्ठापना युवानेते कै. वाय. बी. चौगुले सर यांनी इ.न. 1985 साली आंतरराष्ट्रीय युवक वर्षाचे औचिक साधून केली. नवहिंद क्रीडा केंद्राने मराठी मॉडेल स्कूलचा शाळेतील फळे दुरुस्तीकरुन युवकांच्या विधायक व शैक्षणिक कार्याची मुहुतमेढ रोवली.
त्यानंतर नवहिंदने बौध्दीक स्पर्धा, शारिरिक स्पर्धा, खो–खो-, कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. नवहिंदने वृक्षारोपण, मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, मोफत नेत्र शस्त्रक्रीया शिबीर अशी विविध कार्ये केलेली आहे्त.
त्याचबरोबर अनेल गरजू व पिडीत व्यक्तिंना नवहिंदच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून दिली. किल्लारी लातूर येथील भूंकप निधी, कोरोना काळात कर्नाटक व महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्य निधीला भरघोस मदत देवून सामाजिक बांधीलकी जपली आहे.